हायवेजवळ शासकीय शारिरीक शिक्षण महाविद्यालयचे ग्राऊंड असून येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपनगर कार्यालये आहेत.
या मैदानावर दरवर्षी जिल्हा पातळीच्या (मुंबई), विभागीय पातळीच्या ( पालघर, ठाणे, मुंबई) मैदानी स्पर्धा होत असतात.
स्पर्धेसाठी शाळा, कॉलेजमधून शेकडो मुले, मुली येतात. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्वच्छतागृह, चेंजिंग रुम सुविधा नाही. पुरुष व स्त्री साठी फक्त एक - एक स्वच्छतागृह आहे.
शेकडो स्पर्धकांची मोठी गैरसोय होते.
एकीकडे शासन क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे आहे आणि दुसरीकडे स्पर्धकांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत.
No comments:
Post a Comment