जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष प्रा. देविदास पंडागळे यांची मुलाखत घेण्यात आली.
कामगार युनियन स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे ?
- खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून कामगार कायदे नीट पाळले जात नाहीत. असंघटीत कामगारांची अवस्था खूप वाईट असून त्यांना हक्क, अधिकार मिळत नाहीत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी युनियनची स्थापना करण्यात आली.
कामगारांचे प्रश्न सोडविण्याची आपली पध्दत कोणती आहे ?
- कामगारांचे प्रश्न सोडविताना कंपनी व मालक यांचेदेखील नुकसान होणार नाही, हे पाहिले जाते. मालकांशी मध्यम मार्गाने चर्चा करुन कामगारांचे प्रश्न सोडविले जातात.
आपण मुळचे सामाजिक कार्यकर्ते आहात, जनतेचे प्रश्न कसे सोडविणार ?
- जनता आपल्या विभागातील प्रश्न समस्या आमच्याकडे घेऊन येत असते. त्या देखील आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करत असतो.
ज्या विभागातील प्रश्न आहे, तेथे श्रमिकराजच्या बँनरखाली गट बनविण्यात येऊन पदाधिकारी नेमले जातात.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा प्रश्न अशा प्रकारे सोडविला आहे.
No comments:
Post a Comment