नगरसेवक, आमदार, खासदार हे जनतेची कामे त्वरीत व्हावीत यासाठी कार्यालय सुरु करतात. येथे कर्मचारी नियुक्त करतात.
मात्र बहुसंख्य जनतेची अशी तक्रार असते की, हे सर्व कर्मचारी जनतेची कामे करण्यास तत्परता दाखवत नाहीत.
उद्या या, साहेबांना विचारावे लागेल अशा प्रकारची टाळाटाळ करत रहातात.
ही गोष्ट लोकप्रतिनिधींना माहिती नसते. ते कधीतरी कार्यालयात येतात. त्याच दिवशी कर्मचारी सक्रीयपणे कामे करताना दिसतात, त्यांच्या साहेबांना दाखवण्यासाठी !!
म्हणून लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्मचाऱ्यांना,
जनतेची कामे वेळात करा अशी नेहमी सूचना करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment