महाराष्ट्र बंद जाहीर झाल्यावर जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या नावाने मेसेज फिरु लागले की,
वादग्रस्त, भडकवणारे मेसेज पाठवल्यास कारवाई करु.
पोलिस प्रशासन ही दमबाजी कोणाला करत होते ? ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, तो आंबेडकरी समाज महाराष्ट्र बंद करणार होता त्यांना !!
भिमा कोरेगावला जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करताना ही तत्परता पोलिसांनी का दाखवली नाही ? वाहने सहज पेटवली जात होती, तिथे पोलिस का बघत राहिले होते ?
दंगल पूर्वनियोजित होती, याचे पुरावे आहेत. दंगल घडवली जाणार आहे यांची माहिती असतानाही पोलिस बंदोबस्त का ठेवला नाही ? घरांवर दगड जमा केले आहेत, याची पोलिसांना माहिती नव्हती का ?
याचा अर्थ पोलिस निष्क्रीय राहिले किंवा त्यांच्यावर राजकीय दबाव होता. पोलिस अधिक्षक फोन घेतच नव्हते, मग काय कामाचे असे आयएस, आयपीस अधिकारी ?
भिमा कोरेगावला दंगल सुरु होती तेव्हा एकही मंत्री निषेध करायला, घटनास्थळी भेट द्यायला आला नाही.
अन्याय झालेल्यांनी महाराष्ट्र बंद केल्यावर सरकारचे मंत्री बिळातून बाहेर पडले.
बोलू लागले, या लोकांनी किती नुकसान केले.
भिमा कोरेगावला अभिवादन करण्यास आलेल्या लोकांना मारहाण केली, त्यांची वाहने जाळली, हे नुकसान नव्हते काय ?
याबद्दल मंत्री का बोलत नव्हते ? तेव्हा का गप्प राहिले ?
No comments:
Post a Comment