Thursday, 28 December 2017

संपादकीय

आरोग्य हा विषय जनतेसाठी आवश्यक व महत्वाचा असूनही
सरकारने सरकारी रुग्णालयातील उपचार दर दुप्पट महाग करुन ठेवले.

आरोग्य सेवा ही मोफत, अल्पदरात असायला पाहिजे, पण केसपेपर काढण्यापासूनच पैसे उकळायला सुरुवात केली.
गरीबांनी उपचार कोठे करायचे ?

सर्व लोकप्रतिनिधी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत, त्यांना काय देणेघेणे आहे ? त्यांच्याकडे प्रचंड रुपये असल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचार करु शकतात.

तिकडे खाजगी रुग्णालये रुग्णांची वाटच पहात असतात. या रुग्णालयांवर सुध्दा सरकारचा कंट्रोल नाही.

जनतेला आपले हक्क, अधिकार माहिती नसल्याने ते नशिबाला दोष देत खाजगी रुग्णालयात जातात. कर्ज काढून हजारोंचे बील भरतात.

दोष तर त्या लोकप्रतिनिधींना दिला पाहिजे, जे शुभेच्छा, अभिनंदनचे बँनर लावण्यातच गुंग आहेत.

Saturday, 16 December 2017

खासगी दोन व्यक्तींच्या वादातही काही पोलिस


भाग - 5
कोणा एकाची बाजू घेऊन उतरत आहेत, वर्दीच्या जोरावर प्रकरणे मिटवण्याचाही प्रयत्न काहींनी केला.
त्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली.

पोलिस कम्प्लेंट ऑथॉरिटीचा पत्ता -
कुपरेज एम.टी.एन.एल. एक्‍स्चेंज बिल्डिंग,
महर्षी कर्वे मार्ग, मुंबई - 400021

फोन ०२२-२२८२००४५/४६/४७
कोकण भवन, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर येथेही ऑथॉरिटीचे कार्यालय

Wednesday, 13 December 2017

मात्र खोटी तक्रार केल्याचे सिद्ध झाल्यास

भाग - 4
तक्रार करणाऱ्यावर कारवाईची यात तरतूद आहे.

तपासाच्या नावाखाली कोणालाही ताब्यात घेणे, ताब्यात घेण्याची भीती दाखवणे, ताब्यात घेतल्याची स्टेशन डायरीला नोंद न करणे किंवा ज्याला ताब्यात घेतले, त्याच्या कुटुंबीयांना लगेच न कळविणे ही काही पोलिसांनी पध्दतच सुरु केली.

Tuesday, 12 December 2017

पोलिस कोठडीत संशयित आरोपीचा


भाग - 3
मृत्यू, संशयिताला झालेली मारहाण, कायदेशीर बाबींची पूर्तता न करता संशयित म्हणून पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवणे, लाच मागणे, कायद्याची भीती दाखवून खंडणी वसूल करणे

असा कोणताही प्रकार पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी केला तर संबंधिताला केवळ एका प्रतिज्ञापत्रावर या ऑथॉरिटीकडे दाद मागता येणार आहे.

Monday, 11 December 2017

आता मात्र पोलिस कम्प्लेंट ऑथॉरिटी कार्यरत झाल्यामुळे


भाग - 2
तक्रार करणे सोपे झाले. पोलिस विरोधी तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.

पोलिस वर्दीच्या नावाखाली मी काहीही करू शकतो, ही काही पोलिस अधिकारी व पोलिसांनी निर्माण केलेली भीती कमी होणार आहे.

पोलिसांच्या अधिकाराला कोणताही धक्का लागणार नाही व पोलिस आपल्या अधिकाराचा गैरवापरही करणार नाहीत.

Sunday, 10 December 2017

पोलिसांच्या गुन्हेगारीला अंकुश बसावा म्हणून,


(भाग 1)

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्र सरकारने पोलिस कम्प्लेंट ऑथॉरिटी तयार केली.

एखाद्या गुन्ह्यात संशयित म्हणून एखाद्याला ताब्यात घेण्याचा पोलिसांना नक्कीच अधिकार आहे पण,
अनेक प्रकरणांत संशयिताला ताब्यात घेतल्यावर त्याच्या कुटुंबीयांना न कळवता, त्याची कोठेही नोंद न करता, तपासासाठी त्याला फिरवत होते. हे सारे बेकायदेशीर होते. अशा पोलिसांची तक्रार कोठे करायची हे जनतेला माहिती नव्हते.

SRA इमारतींच्या निकृष्ट बांधकामांच्या

तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत रहिवाश्यांसाठी ज्या इमारती बांधल्या जातात, त्यांची एका वर...